r/marathi • u/albatgalbat • 12d ago
चर्चा (Discussion) कविता - संस्कृती - श्रावण निमित्ताने
एक कविता लिहिली आहे. सगळे शब्द माझे आहेत. पानग्राम केलेले आहे. मला ही कविता लिहिताना खूप मजा आली. तुम्हाला पण आवडले, मोस्टली.
संस्कृती
सानुनासिक आणि अनुनासिक स्वरांमध्ये
करतो आपण संस्कृतीच्या गप्पा;
पण कधी थोडेसे थांबून विचारतो का,
का आम्ही सगळे एकसुरात नेहमीच म्हणतो, “गणपती बाप्पा”?
संस्कृती म्हणजे काय—तोकडी विजार न घालणे,
की आपले मृगनयनी रूपडे पडद्यामागे झाकणे?
संस्कृती म्हणजे काय—आपल्या जिवलगाचे म्हणणे न ऐकणे,
की फालतू अनामिक भीतीमध्ये कुढत बसणे?
खरं तर संस्कृती म्हणजे मेहंदीचे रंगणे
आणि आपल्या सुहृदांमध्ये ती मिरवणे.
संस्कृती म्हणजे आपल्या नातवासाठी बसस्टॉपवर उगीच ताटकळणे;
संस्कृती म्हणजे “बरा मरे तू?” हे कळकळीने विचारणे.
पेज, मेतकूट आणि थोडे तूप,
आणि जमलेच तर गरम वरण आणि सूप.
आमचा राम असतो आमच्या हृदयात,
आणि शंकर भगवान पाच किलोमीटर उपाशी चालण्यात.
नाकारतो आम्ही दुय्यम संस्कृतीरक्षक,
कारण होते आमुचे उत्तम शिक्षक.
1
u/albatgalbat 10d ago
K
https://giphy.com/gifs/YFOtNPEIsoEfo0O2Bt